उसाच्या मळीवर येत्या गुरुवारपासून ५० टक्के निर्यातशुल्क !

उसाच्या मळीचा वापर मद्यार्क उत्पादनासाठी होतो. मळीची देशांतर्गत उपलब्धता वाढवणे आणि पेट्रोलमधे इथेनॉल मिश्रणासाठीचे उद्दिष्ट गाठणे या हेतूने हा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रसरकारने उसाच्या मळीवर ५० टक्के निर्यातशुल्क लावले आहे. येत्या गुरुवारपासून म्हणजेच १८ जानेवारीपासून हा आदेश लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. ही सवलत आता ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू राहील. खाद्यतेलांच्या आयातशुल्कातल्या सवलतीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरच्या आयात शुल्कात कपात करुन ते साडेबारा टक्के करण्यात आलं होतं. यामुळं ग्राहकांना खाद्यतेल किफायतशीर दरात उपलब्ध होईल असं सरकारी पत्रकात म्हटले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत