प्रा. मधु दंडवते शताब्दी म्हणजेलोकशाही संघर्ष जागृती होय !
प्रा. मधु दंडवते यांचा जन्मशताब्दी समरोह समारंभ हा दि. 21 जानेवारी 2024 रोजी आपण साजरा करतो आहोत. त्यांच्या समवेत केंद्रीय पातळीवर ज्यांनी काम केले , लोकसभेत वैचारिक भुमिका विशद करताना ज्यांनी त्यांना जवळून पाहिले आहे असे अनेक विविध लोकशाहीवादी पक्षांचे राष्ट्रीय नेते याला आवर्जून उपस्थित राहाणार आहेत .याचे मुख्य कारण प्रा. मधु दंडवते शताब्दी वर्ष हे एक निमित्त आहे. आजच्या परिस्थितीत जर प्रा. दंडवते असते तर त्यांनी ज्या लोकशाही समाजवादी मूल्यांसाठी संघर्ष केला त्यासाठी ते संपूर्ण देशभर लोकांमध्ये झंझावात निर्माण करण्यासाठी सरसावले असते. हिटलरचे गुणगाण गाणारे धर्मांध फॕसिस्ट देशात सत्तेवर आहेत . त्यांनी संविधानाविषयी ब्र न काढता संविधान मुळातून कसे उध्वस्त करता येईल याचे षडयंत्र सुरू केले आहे . धर्मांध उन्माद एवढा शिगेला नेला आहे की अन्य धर्माच्या लोकांना देशात असुरक्षितता वाटू लागली आहे. विकासाच्या पोकळ प्रसारात जनतेला भ्रमिष्ठ करण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रा. दंडवते यांनी जे केले असते त्याचे जाग्रण करण्यासाठी आपण त्यांचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ दि. 21 जानेवारी 2024 रोजी साजरा करतो आहोत. आपण सद्य राजकीय परिस्थितीला आव्हान देणारे आहोत , दंडवते यांनी जागवलेल्या तत्वज्ञानाचे पाईक आहोत . आपल्या सोबतच्या सहका-र्यांना घेऊन ह्या समारंभाला यावे असे आवाहन करीत आहोत !
” प्रा. मधु दंडवते जन्मशताब्दी समारोह “
रविवार दि. 21 जानेवारी 2014 रोजी सायं. 3 वा.
स्थळ ः यशवंतराव चव्हाण सभागृह , मंत्रालयाजवळ
अध्यक्ष ः स्वातंत्र्य सेनानी जी जी परिख
प्रमुख वक्ते ः मा. शरद पवार , मा. फारूख अब्दुला , मा. लालूप्रसाद यादव , मा. उध्दव ठाकरे , मा. सिताराम येचुरी , मा. पृथ्वीराज चव्हाण , मा. डी राजा , मा. एम के प्रेम रामचंद्रन मा. हुसैन दलवाई , मा.जयंत चौधरी , मा. दानिश अली
संयोजक ः अरूण श्रीवास्तव , विजया चौहान , मधु मोहिते , विद्या चव्हाण , प्रकाश रेड्डी , एस के रेगे , प्रभाकर नारकर , भाई राजू कोरडे , सुनीलम , प्रा प्रकाश सोनावणे , शरद कदम , नितीन आणेराव , अभिजित हेगशेट्ये , शशीकुमार झा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत