अल्झायमरचा आजार ठरू शकतो घातक

वाढत्या वयाबरोबरच होणाऱ्या अल्जायमर रोगाचा संबंध आतड्यांच्या आरोग्याशी आहे. आतड्यांचे आरोग्य चांगले नसणाऱ्या व्यक्ती या आजाराने त्रस्त होऊ शकतात, असा दावा ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी केला आहे. यासाठी त्या देशातील सुमारे चार लाख लोकांच्या आरोग्याच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. २०३० पर्यंत आठ कोटींपेक्षा अधिक रुग्णअल्जायमरमुळे विचार करणे, समजण्याची शक्ती नष्ट होते. हा आजार पूर्ण बरा करणारे उपचार सध्यातरी नाहीत. २०३० पर्यंत जगभरात या आजाराचे आठ कोटी २० लाख रुग्ण असतील, असेही संशोधक सांगतात.
एडीथ कोवान विद्यापीठाचे संशोधक इमॅन्यअल एडवुई यांनी ‘कम्युनिकेशन बायोलॉजी’ जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात सांगितले की, अल्जायमरचा संबंध फक्त पोटाशी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आम्ही हा आजार आणि आतड्यांसंबंधी व्याधी याबाबत आभ्यास केला.
इमॅन्युअल यांच्यानुसार आतड्यांचे आरोग्य आणि अल्जायमर यांच्यातील संबंधांची माहिती मिळाल्यामुळे कोणाला ही व्याधी होऊ शकते, याबाबत निदान करणे शक्य होणार आहे. या आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान झाले तर त्याचा वेग कमी करता येऊ शकतो. तसेच या आजारावरील उपचारांचे नवीन मार्ग शोधणे सुलभ होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत