तलाठी भरतीची SITमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी…

पेपरफुटीमुळे तलाठी भरतीची संपूर्ण प्रक्रीया रद्द करण्यासाठी राज्यभरात परीक्षार्थींची आंदोलने सुरू आहेत. तलाठी पद भरती प्रक्रीया रद्द करावी, तसेच या भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. राज्यात अँम्ब्युलन्स घोटाळा उघड झाला असून अँम्ब्युलन्स पुरवठ्याचं टेंडर सरकारनं रद्द करावं, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावं, या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं परीक्षार्थीं आंदोलकांवर केलेले मागे सरकारनं मागं घ्यावेत, असं वडेट्टीवार यांनी म्हटले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत