२०२३-२४ च्या खरीप हंगामात सुमारे ६ कोटी टन भाताची खरेदी…

किमान हमी भावासाठी सुमारे एक लाख तीस हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून,त्याचा ७५ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे,असं ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे. २०२३-२४ च्या खरीप हंगामात सुमारे सहा कोटी टन भाताची खरेदी झाली आहे. देशात विविध कल्याणकारी योजनांसाठी भाताची वार्षिक गरज,सुमारे चार कोटी टन असून,देशात सध्या सव्वापाच कोटी टन भाताचा साठा गोदामांमध्ये उपलब्ध आहे.मार्चपासून सुरू होणाऱ्या रब्बी हंगामासाठी गव्हाची जास्तीत जास्त खरेदी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत