
चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष-कर महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेसतरा टक्के वाढ नोंदवत यंदा १२ लाख ३७ हजार कोटी रुपयांचा महसूल प्रत्यक्ष करांच्या रुपाने जमा झाला आहे. वैयक्तिक प्राप्तिकरापोटीमिळालेला महसूल ३१ पूर्णांक ७७ शतांश टक्क्यांनी जास्त आहे तर कॉर्पोरेट प्राप्तिकर महसुलात १२ पूर्णांक ४८ शतांश टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्रलयाने आतापर्यंत एक लाख ७७ हजार कोटी रुपये कर परतावा दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत