पेन्शन विरोधी “ काळ्या कायद्याची जाहीर होळी “

समाज माध्यमातून साभार
करण्या करिता वयोवृद्ध पेन्शनधारक , कुटुंब पेन्शन धारक , सर्व केंद्र सरकारी अधिकारी , कर्मचारी, सर्व शासकीय राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी , सर्व निम सरकारी कर्मचारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर येथे लाखोंच्या संख्येने दिनांक ३/ एप्रिल /२०२५ रोजी एकत्र येऊन आंदोलन मधे सामील व्हावे !
मित्रानो, वित्त कायदा नुकताच केंद्र सरकारने लोकसभेत मंजूर केला आहे. हा कायदा पेन्शन धारक विरोधात आहे कारण पेन्शन फंडाचे पूर्ण अधिकार न्यायिक न राहता प्रशासकीय होणार आहेत म्हणून , पेन्शनर अधिकारी व कर्मचारी संघटना तर्फे ३ एप्रिल रोजी संपूर्ण भारतभर निदर्शने आयोजित केली आहेत .. कलेक्टर कचेरीवर तीव्र निदर्शने केली जाणार आहेत… पेन्शन फंडाचे सर्व अधिकार केंद्र सरकारने ह्या बिलात आपल्या ताब्यात घेतले आहेत . १९७२ चा पेन्शन कायदा व आर्टिकल १४ अंतर्गत न्यायिक हक्क काढून , प्रशासकीय अधिकार प्रदान करण्यात आले आहेत , या कायद्याने आपल्यावर काय परिणाम होणार ? जाणून घ्या मित्रानो …
१) पेन्शन रिव्हिजन कधीच होणार नाही !
२) भविष्यात महागाई भत्ता गोठवला जाईल!
३) भविष्यात पूर्ण पेन्शन बंद केली जाईल !
४) कुठल्या ही कोर्टात दाद मागता येणार नाही .
५) काही अब्जो करोड चा पेन्शन फंड १००% सरकारी मालकीचा अधिकार राहील .
६) सुप्रीम कोर्टाचे सर्व निर्णय ह्या कायद्याने आपोआप रद्द होतील .
७) हे बिल लोकसभेने मंजूर केले आहे ( त्या अगोदर खासदारांचा पगार व भत्ते २५% ने वाढवले आहेत)
८) आज राष्ट्रपती द्वारा हा कायदा अमलात आला आहे !
म्हणून , देशभर ३ एप्रिल रोजी या काळ्या कायद्या विरोधात आंदोलन सुरू होणार आहे ,
कृपया याची व्याप्ती लक्षात घेऊन , लाखोच्या संख्येने सामील व्हा !
ज्ञानेश्वर गायकर पाटील
सर्कल सचिव , SNPWA महाराष्ट्र
९४२२२२९७००
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत