महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

खासदार निवडतांना – शिवराम पाटील

शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

शकले पण रक्षा खडसेंना हे शक्य झाले नाही.तरीही पुन्हा निवडणूक लढत असतील तर, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे.
जळगांव जिल्ह्यातील हे सत्ताधारी पक्षातील खासदार तर प्रधानमंत्री समोर सिपाई,वार्डरली सारखे वागतात.उन्मेष पाटील अजून तरी जळगाव ते चाळीसगाव रस्ता रुंदीकरण करू शकले नाहीत.पाचोरा जामनेर रेल्वे रूंदीकरण करू शकले नाहीत.कोरोना काळातील पालकमंत्री व कलेक्टर ने केलेला करोडोचा अपहार थांबवू शकले नाहीत.कदाचित पाटील आणि खडसे त्या चोरीतील वाटेकरी असावेत.जसे सर्वच दहा आमदार या चोरीतून हिस्सा घेत होते.फक्त चिमणराव पाटील यांनी आक्षेप घेतला.तर उद्धव ठाकरेंनी त्यांना चूप बसवले.आबा नका बोलू,चोर आपलाच मंत्री आहे.पुढे तोच चोर ठाकरेंशी गद्दार निघाला.तेंव्हा ठाकरे जळगाव ला येऊन रडत राहिले,माझा बाप चोरला.माझा पक्ष चोरला.माझा चिन्ह चोरले.आमचे कोरोनाचे औषध आणि यंत्र सामुग्री चोरली तेंव्हा ठाकरेंना कळ लागलीच नाही.२५९१माणसे मेल्याचे दुःख झालेच नाही."अब काहेको रोये,जब गधे खा गये खेत!"
विरोधी पक्षातील माणसे सुद्धा अंगाला तेल लावून आखाड्यात उतरत आहेत.या आधीही सतीष पाटील यांनी कधीही शेतकरीची बाजू मांडली नाही.बोंडअळीची नुकसानभरपाई मिळवताना ते शेतकरी विरोधात होते.गुलाबराव देवकर तर नेहमीच म्हणतात, तुम्ही तुमचे प्रश्न सोडवून घ्या, आम्ही आमचे प्रश्न सोडवू.मला वाटते यांना प्रश्न कळत नसावे किंवा ते प्रश्नाला घाबरत असावेत.ही माणसे खासदार बनली तर टपाल नेण्याचेही काम करणार नाहीत.जळगांव जिल्ह्यातील मंगेश चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांना लवकर प्रश्न समजतात.उत्तरे तेच शोधून काढतात.पेपरही तेच तपासतात.मार्क ही तेच देतात.ते कोणत्याही गुरूजींच्या भरोशाने परीक्षा देत नाहीत.ही दोन माणसे खासदार बनण्याच्या पात्रतेची वाटतात.चिमणराव पाटील, गुलाबराव पाटील , किशोर पाटील मतदारांना प्रतिसाद देतात.बाकीचे फक्त नांव पटलावर आणि सतत गैरहजर.पटसंख्या कमी पडते म्हणून वरच्या वर्गात घेतले.
आता आणखी काही श्रीमंत लोकांनी इडीची कारवाई होऊ नये म्हणून कमवलेले धन खासदार निवडणुकीत खर्च करण्याचे ठरवले आहे.अंधी बहिरीच्या संपत्ती वर हात मारून पैसा जमवला आता खासदारकीचे स्वप्न पाहात आहेत.काहींनी मतदारसंघातील मुर्ख लोकांची संख्या मोजली.ती निम्म्यापेक्षा जास्त भरली.म्हणून बाबा,बुवा,संत,महंत, पंडित यांचे किर्तन प्रवचन आयोजित करीत आहेत.असे केले तर आपण सज्जन, सभ्य, प्रामाणिक, सेवाभावी आहोत असा समज निर्माण करीत आहेत.जसे मोदींनी रामाचे नावाने निवडणूक जिंकली.तशी आपणही जिंकू शकतो.वीस कोटीचे कैपीटल लावले तर दोनशे कोटी कमवू शकतो.पण अशी माणसे खासदार पदासाठी पात्र नाहीतच.उलट धोकेदायक ठरतील.त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट करून पैसा कमवलेले चांगले.
महाराष्ट्रात राजू शेट्टी हेच एकमेव खासदार होते ,ज्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रॅक्टीकल पॉलिटिक्स केले.जे बोलले ते मिळवून दिले.निवडणुक पुर्वीची भुमिका निवडणूक नंतर बदलली नाही.त्यांचेशी कोणा माणसाची किंवा बाईची तुलना होत असेल तर आपण त्यांना खासदार म्हणून निवडून दिले पाहिजे.
आमदार म्हणून सर्वोत्तम भुमिका बच्चू कडू यांची आहे.सत्तेत असोत कि विरोधात ते त्यांची भुमिका बदलत नाहीत.राग आला तर कायदा पाळत नाहीत.जे चुकले त्याला माफी नाही.चुकीला माफी नाही.तेच पोलिस.तेच न्यायाधीश.तेच जल्लाद.असाच माणूस खासदार पदाला पात्र आहे.त्यांचेशी कोणा माणसाची किंवा बाईची तुलना होत असेल तर खासदार म्हणून निवडून दिले पाहिजे.
जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे एकमेव माणूस आहेत कि, ज्यांना राजकारण, शासन, प्रशासन याचे ज्ञान आहे.कळले ते बोलण्याची हिंमत आहे.कलेक्टर, एसपीला राबवण्याची हिंमत आहे.चुकीच्या कामासाठी जास्त.तेच एकमेव खासदार पदासाठी आजतरी जळगाव जिल्ह्यातील पात्र उमेदवार आहेत.फक्त त्यांनी शपथ घ्यावी कि,मी आहे त्या संपत्तीत एक रूपया वाढ करणार नाही.
जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन हे प्रत्येक माणसाला आणि बाईला भेटतात.तितका वेळ अणि संयम त्यांचेकडे आहे.त्यांना प्रश्न कळतो. ते मदत करण्याच्या मूडमधे असतात.मदत करतात.जनतेला सर्वाधिक वेळ देणारा माणूस म्हणून ते ख्यातनाम आहेत.कोणत्याही वाघाला,सिंहाला चॉकलेट,लिमलेट गोळी खाऊ घालून शांत करतात.रागाने नसले तरीही प्रेमाने प्रश्न मांडण्याची कला त्यांना अवगत आहे.खासदार बनले तर मोदींच्या खिशात हात घालून कामाची वर्क ऑर्डर देऊ शकतात.
खासदार हा देशासाठी कायदे बनवणाऱ्या सभागृहात सदस्य असतो.ते कायदे माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी योग्य कि अयोग्य,याचा आग्रह धरू शकतो.पण आपण मतदार त्यांच्याकडून दारू,मटण ,पैशांची अपेक्षा करतो.येथेच आपण चुकतो.त्यामुळे आधिकतम चोर,बदमाष,लफंगी माणसे खासदार निवडून देतो.आधी आपण आपले मत बनवले पाहिजे.खासदार का निवडून द्यावा?
पेपर, टिव्ही ला पैसे देऊन फोटो बातमी वाजवता येते.ते वाचून, ऐकून मतदारांनी आपले मत बनवू नये.ते जाहिरात कौशल्य आहे.बोलणाऱ्याची बोंडे विकण्याची कला आहे. सज्जनांचा चणा विकला जात नाही.म्हणून सज्जन आपणच ओळखला पाहिजे.बुद्धीमान, ज्ञानी, नीतिमान, प्रामाणिक माणूस आपण ओळखतो,अनुभवतो.पण क्षुल्लक मतलबासाठी टाळतो.निवडून देत नाहीत.म्हणून लोकशाही सुद्धा फेल ठरलेली आहे.कारण आधी आपणच खासदार,आमदार निवडून देण्यात फेल ठरलेलो आहोत.जळगांवमधील लिकर किंग समोर एमबीबीएस सर्जन डॉक्टरला २०१४मधे आणि राजनैतिक,धाडसी पुरूषाला २०१९ मधे आपण टाळलेले आहे.दुष्परिणाम भोगत आहोत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!