आज रात्री मराठा आरक्षणाबाबत निर्णयाक बैठक

आज रात्री साडेदहा वाजता सरकार आणि मराठा आंदोलनाचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये निर्णयाक बैठक होणार आहे या बैठकीत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्याबाबत निर्णय होईल याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
निजामकाळात ‘कुणबी’ अशी नोंद असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्याबाबत राज्य सरकारने गुरुवारी शासन निर्णय प्रसृत केल्यानंतरही आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे स्पष्ट करीत जरांगे यांनी उपोषण कायम ठेवल्याने मराठा आरक्षणाचा तिढा कायम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज रात्री साडेदहा वाजता निर्णयाक बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारचे आणि मराठा आंदोलनाचे शिष्टमंडळही असणार आहे. याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत