शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते आज चिंचवड इथे बोलत ते होते. वृद्ध कलावंतांचे मानधन वाढवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. आगामी काळात सांस्कृतिक कार्य विभागाकडून नवी नाट्यगृहं उभारण्यात येणार आहेत. तसेच नाट्य कलावंतांच्या मागणीनुसार जुन्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येणार आहे,असे त्यांनी सांगितले. यंदाचे नाट्य संमेलन शंभरावे असल्याने संमेलनासाठी ९ कोटी ८३ लाख आणि मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
मराठी रंगभूमीच्या माध्यमातून अनेक वर्ष लोकप्रबोधनाचं कार्य होत आहे,नाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रंगभूमीचा अधिक विकास होईल,असं स्वागताध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले. मराठी नाट्य परिषदेसाठी मुंबईत भूखंड देण्याबाबत सहकार्य करण्यात येईल.आज ओटीटी आणि समाज माध्यमांच्या काळातही मराठी प्रेक्षक नाटक बघायला गर्दी करतो.व्यावसायिक नाटकांची जेवढी चलती आज आहे तेवढाच प्रायोगिक रंगभूमीलाही बहर आलेला आहे,ही अभिमानाची बाब आहे,असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नाट्य रसिकांना नाटकांकडे आकर्षित करणारी नाटके रंगभूमीवर यावीत,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.नाट्य संमेलनासाठी राज्य सरकारनं दिलेल्या निधीचा उपयोग कलाकार आणि पडद्यामागच्या कलावंतांना मानधन आणि आरोग्य विमा काढण्यासाठी करण्यात येईल,असं संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत यांनी सांगितले. देशपातळीवरच्या उत्तम कलाकारांच्या माध्यमातून, विद्यापीठातून नाट्यकलेचं प्रशिक्षण आणि संशोधन व्हावे,अशी अपेक्षा संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल यांनी व्यक्त केली. तर जगात सुंदरता निर्माण करण्यासाठी कलावंतांनी एकत्रित प्रयत्न करावा असे मावळते संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी म्हणाले.नाट्य संमेलन हे कलावंतांसाठी दिवाळी सणाप्रमाणे असून एकत्रित विचार करण्याची उत्तम जागा आहे,असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले. पारंपारीक लोककला असलेल्या वासुदेव, पिंगळा,पोतराज,गोंधळी,दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत