
आरोपपत्रानुसार या प्रकरणातला एक आरोपी सुभम सोनी याने प्रवर्तकांकडून सुमारे 508 कोटी रुपये भरल्याचा खुलासा केला आहे. महादेव बुक बेटिंग अॅप घोटाळ्याच्या संर्दभात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या तक्रारीत छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव आहे. तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या जबाबाच्या आधारे आरोपपत्रात भूपेश बघेल यांच्या नावाचा किमान चार ते पाच वेळा उल्लेख आहे.सुभम सोनी याने भूपेश बघेल यांना मोठी रोख रक्कम पोहोचवण्याची सूचना केली असल्याचे म्हटले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत