राज्यात १ हजार २५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय…

वन विभागाकडून एकूण २ हजार १३८ वनरक्षक पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. राज्यात १ हजार २५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मात्र अनुसूचित क्षेत्रातील पेसा शासकीय पदभरती प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानं सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती.त्यानुसार शासनानं अनुसूचित क्षेत्र पेसा सोडून उर्वरित १ हजार २५६ वनरक्षक पदांची भरती करायला मान्यता दिली आहे. या प्रश्नातून मार्ग काढण्याकरता वनमंत्र्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेला चालना मिळाली आहे. ही भरती प्रक्रिया येत्या १७ तारखेपासून सुरु होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत