गडचांदूर आणि पडोली फाटा येथे चक्काजाम…

वाहन चालकांची अग्रगण्य संघटना अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर आणि पडोली फाटा येथे तारीख ४ जानेवारी २०२४ ला चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगर असलेल्या गडचांदूर नगरात राजीव गांधी चौक, शास्त्रकार पेट्रोल पंप येथे अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पण संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांच्या कुशलतेने नेतृत्वाखाली यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
तसेच चंद्रपूर येथील पडोली फाटा येथे अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे जिल्हा संघटक अनंताभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वाखाली व यांच्या सहकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन यशस्वीपणे पार पाडले.
अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने आतापर्यंत ३० डिसेंबर २०२३ ला चंद्रपूर शहर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध रॅली, दिनांक २ जानेवारी २०२४ ला ट्रान्सपोर्टनगर अम्बुजा फाटा येथे निषेध सभा व स्टेरिंग छोडो आंदोलन व दिनांक ४ जानेवारी २०२४ ला गडचांदूर आणि पडोली फाटा येथे चक्काजाम आंदोलन करून वाहन चालक कामगारांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना एकेक दिवस अग्रेसर होत असून दिवसेंदिवस वाहनचालकांचे अनैशा वाहन चालक कामगार संघटना लक्ष वेधून घेत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत