
परिषदेत सायबर गुन्हे,पोलीस तंत्रज्ञान,दहशतवाद विरोधी आव्हाने, वामपंथी उग्रवाद,तुरुंगामधली सुधारणा या विषयांवर चर्चा होणार. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांची तीन दिवसीय परिषद आजपासून जयपूर मध्ये राजस्थान इंटरनॅशनल सेंटर सुरू झाली. उद्घाटन प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठीच्या मार्गांविषयी देखील या परिषदेत चर्चा होणार आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता,डीपफेक,सारख्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हाने यावरही परिषदेत चर्चा होणार. ते आज जयपूरला रवाना होणार असून आज संध्याकाळी ते पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात भाजपाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. या परिषदेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवारी आणि रविवारी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत