
आज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे दर जाहीर झाले. त्या नुसार मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ रुपये तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहेत .देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लीटर ९६.७२ आणि डिझेलची किंमत ८९.६२ रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०२.६३ रुपये तर डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर आज खनिज तेलाच्या किंमतींमध्ये नाममात्र घसरण दिसत आहे. तरीही दर ९० डाॅलर्स प्रति बॅरल्सपर्यंत पोहोचल्या आहेत. डब्ल्यूटीआय क्रुड ८६.८४ डाॅलर्सवर व्यवहार करत आहे. तर ब्रेंट क्रुड ९०.२३ डाॅलर्सवर ट्रेड करत आहे.
२२ मे २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेलाच्या किमतीत शेवटचा बदल २२ मे २०२२ रोजी झाला होता. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज देखील तेल विपणन कंपन्यांनी नवीन दर अपडेट केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत