मराठवाडा पाणी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय.

मराठवाडा पाणी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडले जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडी धरणात ८.५ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते. दरम्यान सुप्रीम कोर्टाने निर्णय कायम ठेवला आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. जायकवाडी धरणात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक तर नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरण समूहात ७९ ते ८८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जायकवाडीला पाणी सोडणे बंधनकारक असल्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी म्हटले होते. १५ ऑक्टोबरला आढावा याप्रकरणी आढावा बैठक घेण्यात आली होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत