तब्बल १७३वर्षे उलटलीत! जयवंत हिरे…

जयवंत हिरे
1 जानेवारी2024
मनुने लादलेले गुलामीचे साखळदंड तटातटा तोडून स्रियांना शिक्षण-ज्ञानाची कवाडे क्रांतिबा जोतिराव फुले,सावित्रीमाई फुलेंनी सताड उघडली.ज्ञानाच्या त्या लढाईत अधर्म भेद नाकारत फातिमा शेखही सहभागी झाल्या होत्या.
१जानेवारी१८४८ला सावित्रीमाईंनी आरंभ केलेल्या शाळेमुळे शिकलेल्या स्रिया आज कुठ्ठे कुठ्ठे नाहीत?
विज्ञानाच्या तिसर्या डोळ्याने नवनव्या सत्यांना आकलायला लागल्यात,तश्श्याच पार रणांगणावर शत्रूच्या छातीतही धडकीही भरवायला लागल्यात.
पण,त्यांनी त्यांना गुलाम करणार्या त्या अधर्माचे,रुढी-परंपरांचे साखळदंड तोडलेत की,जग जस्सं ज्ञानाभिमुख होऊन ज्ञानाच्या कक्षा विस्तारत आहे.तस्संच या अधर्माच्या गुलामीचे साखळदंड अज्जून करकचून स्वत:ला जखडबंद करायसाठी त्या या ज्ञानाचा मूर्ख वापर करायला लागल्यात?
अधर्म-संस्कृतिच्या नावाने धर्माचे ठेकेदारही आपले पुरुषत्वाचे मापदंड त्यांच्यावर थोपविण्यात २१व्या शतकातही तितक्याच धार्मिकतेने तितकेच यशस्वी ठरत आहेत काय?
सुमारे पावने दोनशे वर्षात स्री गुलामीत काही बदल झालाय?
तेव्हा धर्म त्यांना स्वातंत्र्य देत नव्हता.आणि आता त्या स्वत:च धर्मयोद्ध्या होऊन धर्माच्या गुलामीचे,रुढी-परंपरा-संस्कृतीचे साखळदंड करकचून बांधून घेत आहेत.
काय परिवर्तन होतय?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत