क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे सावित्रीमाईचा जन्म लक्ष्मीबाई व खंडोजी नेवसे यांच्या पोटी झाला. सावित्रीबाईच्या जन्मामुळे स्त्रियांच्या जगण्याला सन्मानाचे जिने प्राप्त झाले. सावित्रीबाई चा जन्म म्हणजे महिलांसाठी सोनेरी जीवनाची पहाट होती. चूल आणि मूल या धर्माधिष्ठित परंपरेला छेद देत सावित्रीबाई घराबाहेर पडल्या. शिक्षण घेतलं, शिक्षका झाल्या, मुख्याध्यापिका झाल्या. सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या नव्या वर्षी म्हणजे 1840 मध्ये ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला.
राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन विषमतावादी व माणसाचे माणूसपण नाकारणारी व्यवस्था अनुभवली तिचे बारकाईने निरीक्षण केले आणि बहुजनांच्या गुलामीचे मूळ हे अज्ञान, अंधश्रद्धा, देव, देवता तसेच दैव आणि धर्मग्रंथात आहे. हे त्यांनी ओळखले आणि ही गुलामगिरी नष्ट करायचे असेल तर स्त्रियांना शिकवले पाहिजे असा त्यांनी निर्धार केला.
पुरुष शिकला तर तो एकटाच पुढे जातो. पण स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब पुढे जाते,तथाशिक्षित होते.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी।
ज्या काळात मुलींना महिलांना शिक्षण देणे हे धर्मशास्त्रानुसार पाप होते. त्यामुळे धर्म बुडतो. अशी समजूत होती. त्या काळात मुलींच्यासाठी शाळा काढणे, त्यांना शिक्षण देणे. हे महाकठीण काम होते.प्रतिगाम्यानी त्यांच्याविरुद्ध रान उठवले, तर तथाकथित धर्म मार्तंडाने सावित्रीबाईचा अतोनात छळ केला. एवढेच नाही तर धर्म मार्तंड आणि ज्योतिरावांचे वडील गोविंदराव फुले यांना समाजातून बहिष्कार करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी ज्योतिरावांना सांगितले की, मुलींना शिक्षण देणे सोडा! किंवा माझे घर सोडा! त्या दोघां दांपत्याने घर सोडले पण शिक्षणाचे कार्य अविरत चालू ठेवले.
मुली आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांना शिक्षण देऊन त्यांच्या जीवनामध्ये अमलाग्र बदल घडून आणणाऱ्या सावित्रीबाई चा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाकडून “महिला शिक्षण दिन” म्हणून साजरा केला जातो।
एक जानेवारी 1848 ते 15 मार्च 1852 पर्यंत अठरा मुलीच्या शाळा काढल्या 1849 साली पुण्याच्या उस्मान शेख नावाच्या मुस्लिम बांधवांच्या घरी मुस्लिम महिलांनाही शिक्षित करण्यासाठी शाळा काढली
सावित्रीबाई या महान कवियत्री होत्या त्यांनी काव्यफुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर असे अनेक काव्यसंग्रह लिहिले। त्या आपल्या काव्यात म्हणतात
ज्योतीने ज्योत पेटली! सावित्री झाली वात!
रात्र काळोख भेदाया! केली तिने सुरुवात!
दूर फेकूनी रूढी द्या रे। परंपरेची मोडून दारे।
लिहिणे वाचणे शिकून घ्या रे।
छान वेळ आली। इंग्रजी माऊली आली।
भटधर्माच्या क्लुप्त्या नाना।
अज्ञानामुळे शूद्र जणांना।
पिळती छळती बहु तयांना।
पेशवाई मेली।इंग्रजी माऊली आली।
विद्येविना गेले। गेले वाया पशु।
स्वस्त नका बसू। विद्या घेणे। शूद्र अतिशूद्र।
दुःख निवारया। इंग्रजी शिकाया संधी आली।
इंग्रजी शिकूनी। जातीभेद मोडा।
भटजी भारुडा फेकूनिया।
जातीभेद अज्ञानावरती टिकून आहे जातीभेदाला नष्ट करायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही
संत तुकारामाचा सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या वरती प्रभाव दिसून येतो त्या लिहितात
नवस करीती।बकरू मारीन।
नवसफेडीन बाळजन्मी।
धोंडेमूल देती नवसा पावती।
लग्न का करती नर णारी।
दोनशे वर्षांपूर्वी कर्मकांड अंधश्रद्धा विषमता भेदाभेद व अज्ञान याच्या विरोधात आवाज उठून समाजाला शत्रू आणि मित्रांची ओळख करून दिली
विषम रचिती। समाजाच्या रिती।
धुरतांची नीती। अमानवी।
शिक्षण घेणे म्हणजे फक्त लिहिणे वाचणे नसून मानसिक गुलामगिरी झुगारून जागृत होऊन विज्ञानवादाचा स्वीकार करणे होय ज्या सावित्रीबाईंनी अंगावर दगड गोटे आणि शेण मारा घेतला फटके लुगडे नेसले वेळप्रसंगी अंगावरचे दागिने विकून मुलींचा संभाळ केला सती प्रथेला रोखण्यासाठी 1854 मध्ये विधवा पुनर्विवाह सुरू केले विधवा मातांना आश्रय देऊन स्त्रियांच्या जीवनात सामाजिक क्रांती घडवून आणली मानसिक क्रांती घडवली बाल हत्या प्रतिबंधक आश्रम काढले ब्राह्मण असलेल्या काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचे पाऊल वाकडे पडले त्यात त्या गर्भवती झाल्यामुळे स्वतः करणार होत्या तेव्हा ज्योतिरावांनी त्यांना स्वतःच्या घरी आणले आणि तिचे बाळंतपण केले आणि झालेला मुलगा त्यांनी दत्तक घेतला आणि क्रांती घडवली
ज्या सावित्रीबाई मुळे स्त्रिया शिकायला वाचायला लागल्या त्याच महिलांना सावित्री वाचायला वेळ नाही हीच खरी खंत आहे आज ही शिक्षित उच्चशिक्षित स्त्रिया अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त झाल्या नाहीत देव देव धर्माच्या पगड्यातून बाहेर पडल्या नाहीत त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असून त्या वृत्तवैकल्य उपासतापास पोथी पुराण सत्यनारायण हळदीकुंकू अशा टाकाऊ रूढी परंपरा पूजा आरच्या नवस वटसावित्री करवा चौथ यात आधी गुरफटलेल्या आपणाला दिसतात त्यामुळेच आज स्त्रियांना संतती न झाल्यास स्त्रियांना सुदोष दिला जातो किंवा मुली झाल्यास स्त्रीलाच दोष दिला जातो हे चुकीचे आहे प्रिया बाह्यरूपी आधुनिक झाल्या परंतु सन्माननीय अपवाद वगळता आतून त्या रुढीवादी परंपरावादी अंधश्रद्धाळूच आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये
एक जानेवारी रोजी लोक नव्या वर्षाचा शुभेच्छांचा एकमेकांवरती वर्षाव करतात परंतु एक जानेवारीला आज महिलांचा इतिहास सावित्रीबाईने बदलला होता तो म्हणजे एक जानेवारी 1848 रोजी महिलांची पहिली शाळा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाईंनी सुरू केली होती म्हणजेच इथल्या समाज व्यवस्थेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवत शिक्षणाच्या क्रांतीला सुरुवात केली ते बंडच महिलांच्या उन्नतीचे पहिले पाऊल होते
ज्ञान नाही।विद्या नाही।
ती घेण्याची गोडी नाही।
बुद्धी असून चालत नाही।
तयास मानव म्हणावे का।
लिहिणे वाचणे नाही।
उपदेश पटायचा नाही।
पशुंना कळे तेही न कळे।
तयास मानव म्हणावे का।
त्यांच्या या मौलिक कार्यामध्ये फातिमा शेख सुद्धा सहभागी झाल्या आणि भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या कटिंग प्रसंगात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी मोठे सहकार्य केले
24 सप्टेंबर 1873 रोजी क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या संस्थेत सावित्रीबाई महिला प्रमुख होत्या 28 नोव्हेंबर 1890 मध्ये क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांचे महापरिनिर्वाण झाले तरीही सावित्रीबाईने त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य अविरत पुढे चालूच ठेवले
सावित्रीबाईंनी आपला सामाजिक कार्याचा वसा जपत असताना 18 97 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली होती तेव्हा आपला मुलगा यशवंत याला पुण्यात बोलवून त्याने प्लेगच्या रुग्णांची सेवा करण्यास सुरुवात केली आणि ही रुग्णसेवी सेवा करताना त्यांनाही प्लेगाची लागण झाली आणि दहा मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले
आशा शिक्षणाचे महान काम करणाऱ्या फुले दांपत्या ना अजून भारतरत्न मिळू नये याच्यासारखे शोकांतिका कुठेही नाही
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत