वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य आयोजित शौर्य दिनानिमित्त अभिवादन बाईक रॅली 2023
वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन, वंचित बहुजन महिला आघाडी,
फुले आंबेडकर विद्वत सभा,भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल,
संयोजक: वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर/पुणे जिल्हा.
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य आयोजित शौर्य दिनानिमित्त अभिवादन बाईक रॅली 2023 नेतृत्व सुजात दादा आंबेडकर रॅलीच्या सुरुवातीला प्रथमता महात्मा फुले स्मारक या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले ,छत्रपती संभाजी महाराज , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ,आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली तसेच रॅलीमध्ये विजय स्तंभाचा रथ बनविण्यात आला होता रॅलीमध्ये 5000 पेक्षा अधिक टू व्हीलर सामील झाल्या होत्या त्याचबरोबर 100 फोर व्हीलर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते . विविध मंडळांनी रॅलीच्या मार्गावरती आतिषबाजी करून त्याचबरोबर सुजात दादांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. लोकांमध्ये रॅली संदर्भात प्रचंड उत्साह होता संपूर्ण रॅली मार्गावर हजारो बाईक स्वर रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्तपणे थांबलेले होते. भिमा कोरेगाव विजयस्तंभ या ठिकाणी सुजात दादा आंबेडकर यांनी विजय थांबा रात्री 12.00 नंतर अभिवादन केले तसेच त्यांनी उपस्थितांना संबोधित केले व त्यावेळी उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह होता , शहरामध्ये प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये रॅली संपन्न झाली .यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ सोनोने, वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा, वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र दादा पातोडे, राज्य कार्यकारणी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरे पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगळ , अमोल लांडगे , एड.अफरोज मुल्ला ,विशाल गवळी, कोल्हापूर जिल्हा निरीक्षक महाराष्ट्र देखरेख समिती सदस्य अतुल बहुले, हे उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत