31डिसेंबरला पीपल्स पॅन्थर कार्यकत्यांची बैठक कार्यालयात आयोजीत करून ‘भारतीय लोकशाही, समाजव्यवस्थे पुढील आव्हाने व ऊपाय ‘या विषयावर परिचर्चा घेण्यात आली…
31डीसें ला पीपल्स पॅन्थर कार्यकत्यांची बैठक कार्यालयात आयोजीत करून ‘भारतीय लोकशाही,समाजव्यवस्थे पुढील आव्हाने व ऊपाय ‘या विषयावर परिचर्चा घेण्यात आली. या विषयावर बोलतांना सभेचे अध्यक्ष डाॅ. भीमराव मस्के म्हणाले की,लोकशाही हे राज्यकारभाराचे रूप असते ते लोकांनी चालविलेल्या राजकारभाराला लोकशाही म्हणतात .जो पर्यंत यादेशात विषम समाज व्यवस्था राहील तो पर्यंत लोकशाही धोक्यात राहील व देश एकसंघ होणार नाही म्हणून लोकांनी समानता व न्यायप्राप्ती साठी सतत संघर्ष करून राज्यकर्त्यांना जाणीव करून द्यावी लागेल. आदिवासी नेते एड.लटारी मडावी म्हणाले की, भारताचे राष्ट्रपती आदिवासी व विधवा स्त्री असल्याने नव्या संसद भवनाच्या ऊद्घाटनाला बोलावले नाही तसेच राममंदिराच्या ही ऊद्घाटनाला निमंत्रीत केले नाही.ही विषम मानसिकता स्वातंत्र्याच्या 75 वर्षात पहायला मिळते ह्याचा खेद वाटतो! हे कसे बदलणार आहोत असा गंभिर सवाल लोकशाही पुढे ऊभा केला आहे. वरिल विषयावर मधुभाऊ ओरके, डाॅ. विजय शेळके,भाऊ मस्के, बंडूभाऊ कदम, सिध्दार्थ चहांदे, अर्चना थूल, डाॅ प्रतिभा मस्के, गुणवंत तेलंग,सिध्दार्थ मस्के, यांनीही चर्चेत सहभाग घेतला. बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.संचालन भीमराव बोरकर,प्रास्ताविक डाॅ प्रदीप मेश्राम तर आभार राजेंद्र नगराळे यांनी केले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत