प्रेस नोट – सोलापूर दि : 31 – सोलापूर आंबेडकरी चळवळीतील एक प्रयोगशील कार्यकर्ता व प्रबोधन विचार मंच
प्रेस नोट – सोलापूर दि : 31 – सोलापूर आंबेडकरी चळवळीतील एक प्रयोगशील कार्यकर्ता व प्रबोधन विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष विश्वास भाऊ गायकवाड यांच्या मातोश्री भामाबाई चोखा गायकवाड यांचा सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक सात व प्रभाग क्रमांक 32 येथून 33 वर्षाची प्रदीर्घ काळ सेवा समाप्त निमित्त नागरी सन्मान सोहळा नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला थाटात संपन्न झाला.
यावेळी सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी यांचा एक आगळा वेगळ्या प्रकारची आईची महती सांगणारी कविता रसिकांना गहिवरून आणण्यास भाग पडली. आदर्श माता भामाई या काव्यामधुन आपल्या शुभेच्छा कवी औटी यांनी व्यक्त केल्या.
भामाई यांनी अथक परिश्रम घेत आपल्या तीन मुली,एक मुलगा,नातवंडे असा परिवार पतीच्या निधनानंतर ही मोठ्या जिद्दीने आपला संसार गाडा हाकला आहे,तसेच विश्वास गायकवाड यांच्या रूपाने आंबेडकरी चळवळी ला एक सक्षम बुद्धिजीवी कार्यकर्ता ज्या मातेने समाजाला दिला अशा आदर्श मातेचा सन्मान सोहळा त्यांच्या डोळ्यासमोर होतो आहे ही इतरांना प्रेरणा देणारी घटना असल्याचे यावेळी उपस्थित प्रा.ज्योती वाघमारे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
यावेळी भामाई गायकवाड यांचा मोठा नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होता.कार्यक्रमाला रिपाईचे युवा नेते हनुमंत कसबे,युवा नेते लखन भंडारे,जितेंद्र साठे,भारतीय बौध्द महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे,माजी अध्यक्ष धम्मरक्षिता कांबळे,नागसेन माने, शाक्य संघाचे संस्थापक अशोक दिलंपाक,गाडे,शिरीष सितासावध आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत