इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धाबाबत संजय राऊतांनी केली पोस्ट इस्रायलने शुक्रवारी व्यक्त केला संताप.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, १४ नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझातील परिस्थिती विषद करणारी एक बातमी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली होती. या पोस्टवर कमेंट करताना त्यांनी “हिटलर ज्यूंचा इतका तिरस्कार का करत होते, हे आता समजतंय का?” असं म्हटलं होतं. त्यांच्या या एक्स पोस्टवरून प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे त्यांना ही पोस्ट तत्काळ डिलिट करावी लागली. परंतु, ही पोस्ट इस्रायलच्या दुतावासांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे.इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावरून संजय राऊतांनी हिटलरचा उल्लेख करत एक्स पोस्ट केली होती. या पोस्टवरून इस्रायलने भारत सरकारला पत्र लिहिले आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धाबाबत संजय राऊतांनी केलेल्या एक्स पोस्टवरून इस्रायलने शुक्रवारी संताप व्यक्त केला. इस्रायली दुतावासाने यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी संजय राऊतांच्या एक्स पोस्टबाबत कडक शब्दांत टीका केली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत