भारतमहाराष्ट्रमुख्य पानशेतीविषयक
केंद्रसरकार २ लाख टन कांदा खरेदी करणार

बाजारात कांद्याची उपलब्धता पुरेशी रहावी यासाठी केंद्रसरकार २ लाख टन कांदा खरेदी करणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर येणाऱ्या ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्याचे दर खाली येतील, असं ते म्हणाले. गेल्या महिन्यात किरकोळ खरेदीदारांसाठी कांद्याच्या भावात ४ पूर्णांक ३ दशांश टक्के घसरण झाली आहे, असं ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत