मुंबईकरांच्या पाणीपट्टीत आठ टक्के दरवाढ होण्याची शक्यता.

मुंबईकरांना आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत दरवर्षी जास्तीत जास्त आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा ठराव २०१२ मध्ये स्थायी समितीमध्ये मंजूर केला होता. त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात पाणीपट्टीत काही टक्के वाढ करण्यात येते. जल अभियंता विभागाचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. आयुक्तांना हा प्रस्ताव मिळाला असून येत्या २५ नोव्हेंबरला त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. दरवाढ लागू झाल्यास १ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
१६ जूनपासून त्याची अंमलबजावणी केली जाते. यंदाही लेखापाल विभागाने खर्चाबाबतचा आपला प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला होता. जल अभियंता विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आपला प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला मिळाला असून येत्या २५ नोव्हेंबर रोजी त्यावर निर्णय घेऊ अशी माहिती महानगरपालिका आयुक्तांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत