मुख्यपानसंपादकीय

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय “काळ्या कोळशाची” खाण,कोळशाच्या खाणीत हात घालून,हात काळे कोण करावे,असे तज्ञांचे मत !

धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयास मागच्या तीन महिन्यापासून जिल्हा शल्य चिकित्सकाची खुर्ची रिकामीच…. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीमुळे आज धाराशिव जिल्हा शाषकीय रुग्णालयाचा फेरफटका मारला असता,धाराशिव जिल्ह्याची आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य गोर-गरीब नागरिकांची आरोग्य वाहिनी असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मागच्या तीन महिन्यापासून जिल्हा शल्य चिकित्सकाची खुर्ची रिकामीच असून या सोबतच अन्य काही धक्कादायक माहिती अशी माहिती समोर आली.

धाराशिव जिल्ह्याच्या गोर-गरीब सर्वसामान्य जनतेची मुख्य आरोग्य वाहिनी असलेल्या धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयास जिल्हा शल्य चिकित्सक नसल्यामुळे रुग्णालयीन आरोग्य विभागातील कामकाजाची हेळसांड सुरू आहे. त्यामुळं शाषकीय रुग्णालयाचे तीन तेरा आणि नऊ अठरा वाजलेले दिसत आहेत. वास्तविक पाहता धाराशिव जिल्हा शाषकीय रुग्णालयास मागच्या तीन महिन्यापासून जिल्हा शल्य चिकित्सकाची खुर्ची ही रिकामीच आरोग्य विभागातील सावळा गोंधळ सर्वसामान्य जनतेसमोर येत असून याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात शल्य चिकित्सक नसल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्य विभागाच्या यंत्रणा ढासळलेल्या दिसून येत आहेत.तर शासकीय रुग्णालयांमध्ये मनमानी कारभार चालू असल्याचे दिसत आहे.तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकाची खुर्ची रिकामी असण्याच्या पाठीमागे जिल्ह्यातील मोठ्या राजकारण्याचा हस्तक्षेप असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.खरं तर धाराशिव जिल्हा आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची शहानिशा करणे अत्यंत गरजेचे आहे.

त्याचबरोबर धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय काळ्या कोळशाची खाण कशी काय झाले आहे ? इथे तीन महिन्यापासून कोणीच कसं काय जिल्हा शल्य चिकित्सकाचा चार्ज घेत नाही, जिल्हा शल्य चिकित्सकाच्या खुर्चीवर बसण्यासाठी येत नाही ? धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा चार्ज घेणे मध्ये काळ्या कोळशाच्या खाणीत हात घालून स्वतःचे हात काळे करून घेणे,अशी परिस्थिती का निर्माण झाली ? याची तपासणी करण्याचे काम आता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह जिल्ह्याच्या खासदारांनी करावे,तरच धाराशिव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांची हेळसांड थांबेल. अशी चर्चा सर्वसामान्य गोर-गरीब जनतेतून आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून आणि नातेवाईकातून व्यक्त होत आहे.

मागच्या काही महिन्यांमध्ये धाराशिव जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमामधून आरोग्य विभागाच्या करोडो,अब्जावधी रुपयाची लयलूट तथा भ्रष्टाचार करण्यात आल्याच्या ही चर्चा मोठ्या प्रमाणात धाराशिव शहरातील कट्ट्या कट्ट्यावर रंगताना दिसत आहेत.मग तो सरकारी खर्च यात्रा आणि जत्रातील आरोग्य सुविधा वरील असो किंवा अन्य आरोग्य शिबिरा सारखे उपक्रम असोत. म्हणजेच धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध आरोग्य उपक्रमाच्या नावाखाली आरोग्य विभागाच्या अर्थकारणाला मोठा सुरुंग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

खर तर महाराष्ट्र शासनाचा विभाग कोणताही असो,त्या त्या विभागामार्फत खर्च करण्यात येणारा निधी हा जनतेचाच पैसा असतो.ही बाब धाराशिव जिल्ह्यातील जनता विसरली असल्यास दिसून येत आहे. धाराशिव सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सर्वात मोठ्या शाषकीय रुग्णालयास तीन महिन्यापासून जिल्हा शल्य चिकित्सक नाहीत,ही बाब अतिशय चिंतनीय आहेच. धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयास नवीन 36 जिल्हा शल्य चिकित्सकाची नियुक्ती का करण्यात येत नाही याचेही उत्तर सर्वसामान्य गोर-गरीब जनतेला आरोग्य विभागाच्या मंत्री महोदयांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले पाहिजे.तसेच या समस्ये बरोबरच जिल्हा रुग्णालयातील आणखी काही महत्त्वाच्या समस्या तोंड आव असून उभा आहेत.जसे,अत्यावश्यक औषधींचा कायम तुटवडा असणे,वर्षानुवर्ष इथल्या जागेवर दबा धरून बसलेले डॉक्टर,अधिकारी असो किंवा सरकारी हॉस्पिटल मधली लॉबिंग असो,रुग्णांसोबत करण्यात येणारी अरेरावी असो या सर्व गोष्टीची सध्या चिकित्सक पणे तपासणी आता आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी वगळून,जनतेनेच करावी काय ? असा प्रश्न सर्वसामान्य गोर-गरीब जनते समोर उभा राहिलेला असल्याचे दिसत आहे.

विजय अशोक बनसोडे
लेखक/संपादक,8600210090
भिमनगर (नागेश नगरी)उस्मानाबाद.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!