१२ हजारांवर बेघरांना स्थलांतरित दाखवून मतदार यादीतून नावे वगळली; औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

भुसावळ शहरातील हद्दीवाली चाळ, आगवाली चाळ परिसरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण २०१८ ला रेल्वेप्रशासनाकडून काढण्यात आले होते. त्यानंतर संबंधित परिसरातील रहिवासी हे स्थलांतरित झाल्याचा अहवाल केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिला. भुसावळ शहरातील १२ हजार ५२६ बेघर नागरिकांना स्थलांतरीत दाखवून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याच्या प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर ११ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने भुसावळ विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीतून संबंधित नागरिकांची नावे वगळण्याची कार्यवाही सुरू केली. या विरोधात झोपडपट्टीचे अतिक्रमण निष्कासित केल्यामुळे बेघर झालेल्या रहिवासी मथुराबाई पवार आणि छोटेलाल हर्णे यांनी मतदार यादीतून नाव वगळण्याच्या कार्यवाहीला अॅड. भूषण महाजन यांच्या मार्फत खंडपीठात आव्हान दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत