क्रिकेटभारतमनोरंजनमुख्यपान

भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे लक्ष्य

पूजा वस्त्राकरने नाबाद 62 धावांचे योगदान दिले. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 82 धावा केल्या. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा पुन्हा एकदा खराब फाॅर्ममध्ये दिसली आणि एक धाव घेतल्यानंतर तिला डार्सी ब्राउनने बोल्ड केले. यानंतर यस्तिका भाटियाने ऋचा घोषसोबत दुसऱ्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. रिचा 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 21 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर काही विशेष करू शकली नाही आणि नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.

यास्तिकचे अर्धशतक हुकले. 64 चेंडूत 49 धावा करून ती बाद झाली. दीप्ती शर्माही 21धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. अमनजोत कौनने 20 आणि स्नेह राणाने एका धावेचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्जचे शतक हुकले. तिने 77 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी खेळली. शेवटी पूजा वस्त्राकरने जलद नाबाद 62(46) धावा करत उत्कृष्ट अर्धशतक झळकावून टीम इंडियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. पूजाने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार लगावले.ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनर आणि जॉर्जिया वेअरहॅमने प्रत्येकी दोन गडी बाद केले. डार्सी ब्राउन, अॅनाबेल सदरलँड, मेगन शुट आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!