परिक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्याचे राज्यपालांचे विद्यापीठांना निर्देश…

राजभवनात आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरु संयुक्त मंडळाची बैठक झाली तेव्हा ते बोलत होते. विद्यापीठांनी अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करावेत, तसंच परिक्षांचे निकालही वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले आहेत. महाविद्यालयांनी एकत्र येऊन क्लस्टर युनिव्हर्सिटी बनवावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. नवीन क्रेडिट अभ्यासक्रम अंमलबजावणी आणि स्थिती, स्वायत्त महाविद्यालयांपुढच्या अडचणी अशा अनेक विषयांवर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सादरीकरण केलं. कुलगुरुंनी ग्रामीण भागातली दहा गावं दत्तक घेऊन त्यांचा सामाजिक विकास घडवावा, तसंच महाविद्यालय परिसर नशामुक्त ठेवावा, असं ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत