ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांनी निवडणुकीपूर्वीच भूमिका घ्यावी.

३१ जानेवारीला निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा
ईव्हीएमच्या विरोधात आता राजकीय पक्षही बोलू लागले आहेत. येणारी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. सध्याच्या वामन मेश्राम परिस्थितीत भाजप निवडणूक जिंकेल अशी शक्यता नाही. मात्र त्यासाठी विरोधी पक्षांना ईव्हीएमच्या विरोधात निवडणुकीपूर्वीच ठोस भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा निवडणुकीनंतर पुन्हा ओरडण्याची वेळ येईल, असा इशारा
बामसेफचे राष्ट्रीय
अध्यक्ष वामन मेश्राम यांनी येथे दिला.
वामन मेश्राम म्हणाले, ईव्हीएमच्या विरोधात बामसेफ सातत्याने लढा देत आहे. ईव्हीएममुळे पारदर्शक व भयमुक्त निवडणूक होऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे. बामसेफचे राष्ट्रीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्यानिमित्त ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशातील सर्वच विरोधी पक्षांनीसुद्धा निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमच्या विरोधात तक्रार केली आहे, काँग्रेसने २००४ व २००९ ची निवडणूक ईव्हीएमनेच जिंकली
या देशात प्रादेशिक पक्षांना संपवणे, कमकुवत करण्यासाठीच ईव्हीएम आणण्यात आले आहे. ईव्हीएमचा घोटाळा केवळ भाजपच करीत आहे असे नाही. याची सुरुवात काँग्रेसनेच केली. २००४ व २००९ ची निवडणूक त्यांनी ईव्हीएमनेच जिंकली. त्यांचे पाहूनच भाजप ईव्हीएमचा घोटाळा करीत आहे. देशात दोनच प्रमुख पक्ष राहावे, सर्व प्रादेशिक, छोटे पक्ष या दोन पक्षांच्या अधीन राहावे, अशी खेळी यांची आहे. सध्या हे चित्र देशात निर्माण झाल्याची स्थिती आहे, असेही वामन मेश्राम यांनी सांगितले. असे असताना निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही. येत्या ३१ जानेवारी रोजी बामसेफतर्फे दिल्ली येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढून त्यांना जाब विचारण्यात येणार आहे. त्यानंतरही निवडणूक आयोग मानले नाही. तर ईव्हीएम फोडण्याचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत