मराठीतील ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक अशोक कांबळे यांचे दुःखद निधन !

मुंबई शुक्रवार
दि. २२ डिसेंबर: मराठीतील ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक अशोक चोखू कांबळे यांचे शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
‘कृष्णाजळी ‘ हे स्वकथन, तर ‘त्यांशी म्हणे जो आपुले ‘ ‘ऐक्याचा खेळ खंडोबा’ इ. त्यांची वैचारिक पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाय कथा, कविता, एकांकिका, व प्रवासवर्णनपर साहित्यादी विविध साहित्यप्रकारही त्यांनी लिलया हाताळले आहेत.अनेक दर्जेदार दिवाळी अंकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे.
सद्धम्म पत्रिका मासिकातील ‘ललित’ या वाचकप्रिय सदराचे लेखक असलेल्या अशोक कांबळे यांचा ‘ठिकरीची फोडणी’ हा कथासंग्रह छापून तयार आहे; परंतु तो प्रकाशित होण्याआधीच त्यांचं आकस्मिक दुःखद निधन झाले. अशोक कांबळे यांच्या निधनामुळे साहित्यिकांच्या जुन्या पिढीशी संबंधित एक महत्त्वाचा दुवा निखळल्याची भावना साहित्यिक वर्तुळात पसरली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत