सहावी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा पुढच्या वर्षी १९ ते ३१ जानेवारी या काळात तामिळनाडूत होणार आहे. चेन्नई, त्रिची, मदुराई आणि कोईंबतूर या शहरांत काही क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आज चेन्नई इथं खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा अधिकृत, शुंभकर, जर्सी, मशाल आणि शीर्षक गीताचं अनावरण करणार आहेत. तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टालिन, ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद, ऑलम्पिक पदक विजेती तलवारबाज भवानी देवी, स्क्वॅश खेळाडू जोशना चिनप्पा, हॉकीपटू एस मारीस्वरन यांच्यासह अनेक प्रसिद्ध खेळाडू कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पूर्वी दिल्ली, पुणे, गुवाहाटी, पंचकुला आणि भोपाळ इथं खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या.
माय भारत कार्यक्रमाचं उद्घाटनही ठाकूर करणार आहेत. त्याचवेळी मीनाम्बक्कम इथं विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ करतील. यावेळी समाजमाध्यमांवर प्रभावशाली असलेल्या व्यक्तींबरोबर ठाकूर संवाद साधणार असून विकसित भारत यात्रेत त्यांनी सहभागी होण्याचं आवाहन ते करणार .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत