
राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी सर्वसमावेशकतेच्या तत्त्वाला चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांग व्यक्तिंना राजकीय संभाषणात न्याय आणि आदर दिला पाहिजे. राजकीय पक्षांनी दिव्यांग नागरिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं टाळावं असे निर्देश निवडणूक आयोगानं काल दिले. याबाबत आयोगानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राजकीय पक्षांनी पूर्वग्रह बाळगून दिव्यांगांशी संबंधित चुकीची विधानं करणं, सार्वजनिक सभा, भाषणं, लेख आणि प्रचार प्रसार सामग्रीमध्ये अपमानास्पद भाषेचा वापर करणं टाळावं. भाषण करताना चांगल्या भाषेचा वापर करण्यासाठी पक्षांतर्गत पुनरावलोकन प्रक्रिया राबवावी असा सल्लाही निवडणूक आयोगानं दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत