
भारताचं२१२ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिका संघानं २ गड्यांच्या मोबदल्यात ४२ षटकं आणि ३ चेंडूत २१५ धाव करत सहज पार केलं. यजमान दक्षिण आफ्रिका संघाकडून टोनी डी झोरझी यानं १२२ चेंडूत नाबाद ११९ धावा केल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुरुषांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत सेंट जॉर्जपार्क इथं दक्षिण आफ्रिकेनं भारताचा ८ गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं.भारताचा डाव ४६ षटकं आणि २ चेंडूत २११ धावात आटोपला. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना उद्या बोलँड पार्क मैदानावर होईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत