
या घटनेबाबत सर्व खासदारांना लिहिलेल्या पत्रात बिर्ला यांनी म्हटलं आहे की या समितीनं आपलं काम सुरु केलं असून ती लवकरच आपला अहवाल सदनासमोर मांडेल. संसद सभागृहामध्ये तेरा डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल सांगितलं. संसद संकुलातील सुरक्षिततेच्या विविध पैलूंचा आढावा घेण्यासाठी एक उच्च अधिकार समिती देखील स्थापन करण्यात आली असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत यासाठी एक भक्कम योजना आखण्याची जबाबदारी या समितीवर सोपवली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत