
दूरसंवादाचा अभाव यांनी गाझातील रहिवासी हैराण झाले आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने ११ व्या आठवड्यात प्रवेश केला गुरुवारी संध्याकाळी इंटरनेट आणि टेलिफोन यंत्रणा पूर्णपणे खंडित करण्यात आले. शनिवारीही ही सुविधा सुरळीत झालेली नव्हती. युद्धामुळे अन्नवितरण व्यवस्थाही विस्कळीत झाली असून अनेकांना तीव्र उपासमारीचा सामना करावा लागत आहे. दोन आठवड्यांत तीव्र भूक अनुभवणाऱ्या विस्थापित कुटुंबांच्या संख्येत ३८ टक्क्यांहून ५६ टक्के वाढ झाली आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रम प्रशासनाने सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत