
उत्तर प्रदेशच्या एका महिला जजने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे पत्र लिहून इच्छा मरणाची मागणी केली आहे. एका जिल्हा न्यायाधीशांनी आपले शारीरिक शोषण केल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागून न्याय मिळाला नसल्याचेही या पीडीत महिला जजने म्हटले आहे. यामुळे न्यायपालिकेत खळबळ उडाली असून चंद्रचूड यांनी हे पत्र गंभीरतेने घेतले आहे.या पत्रातच महिला जजने देशातील सर्व नोकरी, काम करणाऱ्या महिलांना शारीरिक शोषणासह आयुष्य जगायला शिका, असा उद्विग्न सल्ला दिला आहे. तसेच पॉक्सो अक्टदेखील एक खोटं असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एका न्यायालयात ही महिला जज आहे न्यायव्यवस्थेत सहभागी झाले तेव्हा खूप उत्साह होता. मला वाटलेले की सामान्य लोकांना न्याय देऊ शकेन. परंतु, तेव्हा मला कुठे माहिती होते की मलाच एक दिवस न्यायासाठी प्रत्येक दरवाजावर भीक मागावी लागेल. एका जिल्हा न्यायाधीशांनी माझे शारीरिक शोषण केले. या जजना मला रात्री भेटण्यास सांगण्यात आले होते. मी याविरोधात अलाहाबादच्या मुख्य न्यायमूर्तीकडे २०२२ मध्ये तक्रार केली होती. परंतु आजपर्यंत कारवाई झालेली नाही. कोणी तुम्ही त्रस्त का आहात असा साधा प्रश्नही विचारला नाही. मला फक्त निष्पक्ष चौकशी हवी होती, असे या महिलेने पत्रात म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत