डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्म प्रवास व भारतीय संविधान.

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध डा. पैलूंवर माहिती देणारी आजपर्यंत लाखो पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि अजूनही होत आहेत. प्रत्येक पुस्तकांमधून त्यांचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर येत असतो. बाबासाहेबांचे अभ्यासक त्यासोबतच अनुयायांचे असेही म्हणणे आहे की, जे बाबासाहेबांच्या कार्य कर्तृत्वावर सुपारी घेऊन मुद्दाम टीका करतात, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात अशा लोकांना पुस्तकांच्या माध्यमातूनच उत्तर दिले पाहिजे. कारण पुस्तकेसुद्धा एक प्रकारचे दस्तऐवज असतात. लोकांनी त्यांचा अभ्यास करावा काही मुद्दे चुकीचे वाटत असतील, तर जरूर ते खोडून काढावेत. अर्थात, मुद्देसूद स्पष्टीकरणासह, कारण तोंडी बोलण्यापेक्षा लिखित गोष्टीला जास्त महत्त्व असते. असेच बाबासाहेबांचे कार्य कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या विचारासाठी खर्ची घातले. जर अशा व्यक्तीने बाचासाहेबांच्या कार्यकर्तृत्वावर पुस्तक लिहिले असेल, तर ते नक्कीच वाचनीय आणि अभ्यासपूर्ण असते बात शंकाच नाही. असेच एक पुस्तक नुकतेच माझ्या वाचण्यात आले ते म्हणजे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक ज.वी. पवार लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्मप्रवास व भारतीय संविधान हे होय. पुस्तकातील पहिल्याच प्रकरणांमध्ये त्यांनी बाबासाहेबांचा संपूर्ण धम्म प्रवास उलगडून दाखविला आहे. त्यांना बुद्ध धम्माची आवड कशी निर्माण झाली? त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार का केला? आपल्या सार्वजनिक आयुष्यात त्यांनी बुद्ध धम्माची तत्वे कशी रूजवली याबाबतचे लिखाण वाचायला मिळते.
भारतीय संविधानाच्या स्वीकृतीला आता ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. आपण त्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान म्हणून ते आता संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. तसा प्रयत्नही त्यांनी चालू केलेला आहे. त्यात उणिवा काढत आहेत; पण आपण त्यांचा हा डाव उलथून टाकला पाहिजे. त्यासाठी संविधानाचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. संविधान वाचण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असाच संदेश हे पुस्तक आपल्याला देते. आरएसएस फक्त बाबासाहेबांचे नाव घेते; पण त्यांना संविधान मान्य नाही. बाबासाहेबांचा एका बाजूला ते उदो उदो करतात आणि दुसन्या बाजूला त्यांचे विचार कार्य कर्तृत्व खोडून काढतात. याबाबतचे लेखकाने स्पष्ट भूमिका पुस्तकात मांडलेली दिसून येते. संविधानाचा विरोधक तो आमचा विरोधक, अशी ठाम भूमिका आपण आता घेतली पाहिजे. संविधानामुळे सर्वच महिलांची (केवळ एका बिशिष्ट जातीच्या महिलांची नावे) प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. संविधान नसते तर आज महिलांचे स्थान काय असते? हे आज महिलांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. भारताच्या राष्ट्रपती आज महिला आहेत तरीसुद्धा त्यांना भाजपचे सरकार काही ठिकाणी उद्घाटनाला अजिबात बोलवत नाहीत. यावरून आपल्या समस्त भगिनींनी लक्षात घेतले पाहिजे की, एका राष्ट्रपतीला अशी असमानतेची वागणूक मिळते, तर मग आपल्या सर्वसामान्य महिलांचे काय? आपल्याला संविधानाने जे समानतेचा हक दिला आहे त्यामुळे संविधान वाचवण्याची आपलीसुद्धा जबाबदारी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. हे सर्व हे पुस्तक वाचून आपल्याला समजते की, लेखकाने महिलांना वास्तव्याची जाणीव या पुस्तकातून करून दिले आहे, असे मी म्हटल्यास वावगे होणार नाही.
पुस्तकातील परिशिष्ट एक व परिशिष्ट दोन हे फार महत्त्वाचे आहे. अगदी थोडक्यात त्यांनी संविधानाचे महत्त्व त्यात मांडलेले आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या परिशिष्टातून माहीत झाल्या आहेत. पुस्तक वाचण्या अगोदर ही दोन परिशिष्टे वाचावीत म्हणजे पुस्तक समजायला अजून सोपे जाईल, असे मला वाटते.
बाबासाहेबांनी स्वतः गौतम बुद्धाचे जे चित्र रेखाटले होते ते देखील पुस्तकात छापलेले आहे. त्यासोबतच येवला येथे १९३५ साली बाबासाहेबांनी धर्मातराची घोषणा केली होती. त्यावेळी जी पुस्तिका काढण्यात आली होती तिचेही मुखपृष्ठ पुस्तकात दिलेले आहेत. पुस्तकांमध्ये थोड्याफार प्रमाणात मुद्रितशोधनाच्या चुका झालेल्या आहेत त्या पुढील आवृत्तीमध्ये टाळाव्यात अशी मी सूचना करतो. सर्वांनी हे पुस्तक संग्रही ठेवायला काहीच हरकत नाही.
पुस्तकाचे नाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्म प्रवास व
भारतीय संविधान
लेखक: ज. वि. पबार पाने: ४८, किमत : ६० रुपये.
प्रकाशक : अस्मिता कम्युनिकेशन, मुंबई
सुशील म्हसदे, मो. ९९२१२४१०१४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत