सभागृहात नियमाचे विरोधी पक्षांचे १५ खासदार निलंबित

सभागृहात नियमबाह्य वर्तन केल्याप्रकरणी आज लोकसभेत विरोधी पक्षांच्या १४ खासदारांचं निलंबन करण्यात आले. काँग्रेसच्या पाच खासदारांसोबत द्रमुक, तृणमूल काँग्रेस व जनता दलाच्या खासदारांचा समावेश. संसदेच्या मर्यादांचं उल्लंघन केल्याबद्दल या १४ जणांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केले.
संसदेतल्या घुसखोरीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये निवेदन द्यावं व योग्य ती कारवाई करण्यात यावी , अशा प्रकारची मागणी विरोधकांनी केली. सभापतींनी वारंवार सूचना देऊनही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. संसदेची सुरक्षा ही लोकसभा सभापतींच्या अखत्यारीत येते आणि कालच सभापती ओम बिरला यांनी झालेल्या घुसखोरीची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र गृह सचिवांना लिहिले, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत