मुख्यपान
छत्तीसगड सीमेवर दोन नक्षलवादी ठार

मोहल्ला मानपूर जिल्ह्यातल्या बोधीटोला गावाजवळ गडचिरोली पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केले. यातल्या एका नक्षलवाद्याचं नाव दुर्गेश वट्टी असं असून तो कसनसूर दलमचा उपकमांडर होता. १ मे २०१९ रोजी कुरखेडा तालुक्यात जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस शहीद झाले होते. या हत्याकांडाचा दुर्गेश वट्टी हा मुख्य सूत्रधार आहे . दुसऱ्या नक्षल्याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळावरून AK ४७, आणि एक SLR बंदुक ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनीदिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत