भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन सोनिवली गाव बदलापूर पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील सभागृहात रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आले होते.

भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन सोनिवली गाव बदलापूर पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील सभागृहात रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आले होते
अधिवेशनाच्या सुरुवातीला परमपूज्य दलाई लामा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले आणि भारतीय राष्ट्रगीत
व तिबेटियन राष्ट्रगीत या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताचे पठण करण्यात आले
अधिवेशनाच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यानुसार डॉक्टर आनंदकुमार यांना सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन राजाराम खरात यांनी त्यांचा सत्कार केला तसेच अध्यक्ष अमृत बनसोड यांना सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन अशोक गजरमल यांनी त्यांचा सत्कार केला
पेंपा त्सिरिंग यांना सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, देऊन, सुनील दुपटे यांनी त्यांचा सत्कार केला.
ताशी देकी यांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, देऊन, स्मिता मॅडम यांनी त्यांचा सत्कार केला.
धोंडू सांगपो यांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, देऊन, प्रशांत कडलक यांनी त्यांचा सत्कार केला भन्ते – राहुल रत्न यांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, देऊन बाळासाहेब पगारे यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ. मनोज कुमार यांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, देऊन अनिल भालेराव यांनी त्यांचा सत्कार केला. प्राचार्य- कमलाकर पायस यांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन, सुभाष रणपिसे यांनी त्यांचा सत्कार केला. अशोक भंडारे संपादित स्मरणिका प्रकाशन डॉ. आनंदकुमार यांनी केले. त्यानंतर त्यांनी उद्घाटन पर भाषण करून, अधिवेशनाला संबोधित केले.
ताशी देकी, धोंडू सांगपो, कर्मा छोईंग, पेंपा त्सिरिंग
प्राध्यापक नृपेंद्रा मोदी, अमृत बनसोड, प्राचार्य – कमलाकर पायस, अजय खरे, नामदेव साबळे, अभिषेक अवचार, गुलशन गजभिये, डॉ मनोज कुमार, अरविंद निकासे, गौतम जयंत, अनिल भालेराव, इत्यादी अथिथिंनी अधिवेशनाला संबोधित केले. सदर अधिवेशन दोन सत्रा मध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी सचिन रामटेके, राजाराम खरात, एड. डी. के. वानखेडे, यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच हर्षा पाटील मॅडम, तसेच, राजाराम खरात, यांनी आभार प्रदर्शन केले. सदर अधिवेशनात भारत तिबेट मैत्री संघाने काही ठराव मंजूर केले, सदर अधिवेशनात सहभाग असलेल्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास आर्थिक दान, अन्न दान, श्रम दान, केल्या बद्द्ल खूप खूप धन्यवाद
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत