देवांची कुठंच गरज नाही…

१) आपण शिक्षण कुणाकडे घेतो देवाकडे का ?
उत्तर :- नाही शाळेतील शिक्षकांकडे जातो.
२) आपण आजारी पडतो तेव्हा कुणाकडे जातो ? देवाकडे का ?
उत्तर :- नाही दवाखान्यात डाॅक्टर कडे जातो.
३) आपल्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर कुठं जातो ? देवाकडे का ?
उत्तर :- नाही पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांकडे किंवा न्यायालयातील न्यायाधिशांकडे जातो.
४) आपला चरितार्थ कसा चालतो ? देव देतो का ?
उत्तर :- नाही कष्ट करून पोट भरावे लागते.
५) भूक लागल्यावर काय आठवतं? देव का ?
उत्तर :- नाही घर, अन्न आठवते.
६) आपल्याला धान्य, किराणा, कपडा, पाहिजे असेल तर काय शोधतो? देव आणून देतो का?
उत्तर :- नाही दुकानात जाऊन आणावे लागते.
७) माणसाला जगण्यासाठी अन्नधान्य व भाजीपाला कोण पिकवतं ? देव का?
उत्तर :- नाही शेतकरी पिकवतात.
८) देशाचे रक्षण कोण करतं ?देव का?
उत्तर :- नाही सैनिक करतात.
असे अनेक प्रश्न देवाच्या संदर्भात उपस्थित करता येऊ शकतात.
मग सांगा…. देवाची खरंच गरज आहे का ???
प्रबोधनकार ठाकरे- बाळ ठाकरे यांचे वडील व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा म्हणतात,
‘ही देव-देवळं आणि या देव धर्माच्या नावानं चाललेले कर्मकांड ही सगळी पुरोहितांची चालणारी रोजगार हमी योजना आहे’
देवळात जाऊन समाधान, शांती अनुभवणारांचंच शोषण होत असतं, पण जळवा जसं माणसाचं रक्त फुंकर मारून पितात तरीही माणसांना त्याचा पत्ताच नसतो.
तसंच हे शोषण आहे, हेच भक्तांना कळत नाही. देव या शब्दाची फुंकर घालून हे शोषण करणं बेमालूमपणे सुरू असतं. तेव्हा देव असलाच तर भटांच्या पोटात आहे, मंदिरात नाही. हे नक्की…’
देव ही संकल्पना भीती आणि आमिषापोटी निर्माण झाली.
देव आहे हे विज्ञानाने अजूनही सिद्ध केले नाही.
भगवान बुद्धांनी देव नाकारला,
संत तुकाराम महाराजांनी देव नाकारला,
संत सेवालाल महाराजांनी देव नाकारला,
संत गोरोबा महाराजांनी देव नाकारला,
संत नरहरि महाराजांनी देव नाकारला,
संत भगवान बाबांनी देव नाकारला,
बाबासाहेबांनी देव नाकारला,
पेरियार रामस्वामी यांनीही देव नाकारला…
आजच्या कोरोना संक्रमणाच्या काळात प्रत्येक धर्माच्या देवांनी आपापले दरवाजे पटापट बंद केले आहेत आणि म्हणतात काय, तर “भक्तांच्या सोयीसाठी बंद करण्यात आले.” मग त्याआधी कुणाच्या सोयीसाठी हा बाजार सुरू होता?
म्हणजेच कोरोनाने पण आता सांगितले की, देवांचं खुळं मनातून काढून टाका अन् विज्ञानवादी व्हा. हीच खरी शिकवण आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत