खारघर येथे प्रबुद्ध महिला सामाजिक संघाच्या वतीने व इतर संस्थाच्या सहयोगाने संविधान दीन साजरा करण्यात आला तसेच “संविधान जनजागृती” करिता संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


दिनांक 26 नोव्हेंबर रोजी खारघर येथे प्रबुद्ध महिला सामाजिक संघाच्या वतीने व इतर संस्थाच्या सहयोगाने संविधान दीन साजरा करण्यात आला तसेच “संविधान जनजागृती” करिता संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत सर्व महिला पुरुष व मुलांनी मोठ्या संख्येत उत्साहाने भाग घेतला. रॅलीची सांगता तथागत महाविहार येथे करण्यात आली. त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अड. अरविंद सुरवाडे सर यांनी संविधान या विषयावर योग्य मार्गदर्शन केले. एकंदरीत सर्वांच्या सहकार्याने रॅली आणि संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पडला. त्यासाठी प्रबुद्ध महिला सामाजिक संघाच्या अध्यक्ष अनिता ताई झोडापे यांचे मार्गदर्शन आणि इतर मेंबर्स , जया ताई सहारे, अर्चना ताई डेकाटे, सीमाताई जाधव , सुजाताताई मेश्राम, , रीता ताई माटे, अनुपमा ताई शिंगोडे, स्नेहलता ताई अवानखेडकर या सर्वांचे सहकार्य लाभले. अशी माहिती रीताताई माटे यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत