भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती

भीमा-कोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी शौर्य दिनाचे आयोजन केले जाते परंतु येथील जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. मुंबई उच्च न्यायालय येथे आज दि.१३/१२/२०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमित बोरकर साहेब यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. वादी आणि प्रतिवादी यांच्या वकिलांनी बाजू मांडल्या. प्रतिवादी म्हणून मी स्वतः दादाभाऊ अभंग भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष म्हणून हजर होतो तर न्यायालयीन बाजू ॲड रुपेश लांजेकर यांनी मांडली. न्यायालयाने वादी- प्रतिवादी यांच्या वकिलांचे म्हणणं ऐकल्यानंतर अखेर १/१/२०२४ रोजीच्या शौर्य दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सशर्त अटीसह परवानगी दिली असून मबई उच्च न्यायालयाचे आभार…साथ द्या
दादाभाऊ अभंग
अध्यक्ष
भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत