महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान

मणिपूरसारखी स्थिती पुण्यात का? लोकसभा पोटनिवडणूक न घेण्यावरून हायकोर्टाचा आयोगाला सवाल…

2024 च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी तसेच निवडणुकीसंबंधी इतर कामकाजामध्ये व्यस्त असल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे शक्य झाले नाही, अशी असमर्थता दर्शवत केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयाच्या दणक्यापासून बचावाचा प्रयत्न केला. पुण्यात मणिपूरसारखी स्थिती आहे काय, असा सवालही न्यायालयाने निवडणूक आयोगाला केला. खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन सहा महिने उलटल्यानंतरही पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक का घेतली नाही, असा खडा सवाल न्यायालयाने मागील सुनावणी वेळी केला होता. या प्रकरणी सोमवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या वेळी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे अॅड. प्रदीप राजागोपाल यांनी स्पष्टीकरण दिले. 2024ची आगामी लोकसभा निवडणूक तसेच देशभरातील इतर निवडणुकांच्या कामकाजामध्ये व्यस्त असल्यामुळे गेल्या सहा महिन्यांत पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक घेणे शक्य झाले नाही. तसेच आता पोटनिवडणूक घेतली तरी या पदाचा कार्यकाल वर्षभराने संपुष्टात येईल, असे अॅड. राजागोपाल यांनी सांगितले. आयोगाच्या या स्पष्टीकरणावर खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. हिंसक घटनांमुळे तणावपूर्ण वातावरण असलेल्या मणिपूरमध्ये जर निवडणुका घेता येणे शक्य झाले नसते, तर ते समजू शकलो असतो, अशी टिप्पणी खंडपीठाने केली. पुण्यातील रहिवाशी सुघोष जोशी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर ही सुनावणी झाली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!