मेगाब्लॉक रविवारी तिन्ही मार्गांवर…

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १५) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर शनिवारी- रविवारी मध्य रात्री मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी -चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर रविवारी दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील; तर काही लोकल सेवा रद्द असतील.
हार्बर रेल्वे
कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप- डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरिता आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगावकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील; तर पनवेल/बेलापूर/वाशी आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
मध्य रेल्वे
कुठे : ठाणे- कल्याण पाचव्या, सहाव्या मार्गिकेवर
कधी : मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील; तर मुंबईतून जाणाऱ्या मेल- एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या दोन्ही दिशेच्या मेल- एक्स्प्रेस गाड्या १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने गंतव्यस्थानी पोहचतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत