कॅप्टन फातिमा वसीम यांनी सियाचीन ग्लेशियरवरील ऑपरेशनल पोस्टवर तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनून इतिहास रचला आहे. सियाचीन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर, 15200 फूट उंचीवर असलेल्या ऑपरेशनल पोस्टवर त्यांना तैनात करण्यात आले आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणजे उत्तर भारतातील सियाचीन ग्लेशियर. ज्यांची उंची 20,062 फूट आहे. तिथे आता देशाच्या मुलींनाही सियाचीनमध्ये तैनात केले जात आहे. भारतीय लष्कराने सांगितले, कॅप्टन फातिमा वसीमची 15,000 फूट उंचीवर पोस्टिंग त्यांची अदम्य भावना आणि उच्च प्रेरणा दर्शवते.भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. कॅप्टन फातिमा वसीमचे फोटो आणि व्हिडिओही प्रसिद्ध झाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत