नागपूर विधान भवनावर धडकणार काँग्रेसचा मोर्चा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
शेतमालाला भाव नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत. सरकार आरक्षणावर निर्णय घेत नाही. तसेच राज्यात अमली माफियांचा सुळसुळाट झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा सोमवारी नागपूर विधान भवनावर मोर्चा धडकणार आहे.
मोर्चासंदर्भात माहिती देताना प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. पहिल्या आठवड्याच्या कामकाजात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली नाही. याआधीच्या अवकाळीच्या नुकसानीची मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पीकविम्याचे पैसेही मिळालेले नाहीत.शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, नोकर भरती करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, धानाला एक हजार बोनस द्यावा, हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रे सुरू करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवावी या मोर्चाच्या मागण्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत