भुसेंच्या संपर्क कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा.

बुलढाणा : राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे.सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन २६ हजार, पेन्शन, ग्रॅज्युटी आणि सामाजिक सुरक्षा इत्यादी प्रमुख मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे आंदोलन सुरू आहे. मागण्यांची दखल न घेतल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन हजार ६८३ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराचे वितरण ठप्प झाले आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना गेल्या अनेक वर्षांपासून अगदी ५० रुपयांपासून ते १० हजार रुपये इतक्या तुटपुंजा मानधनावर राबविले जात आहे. लसीकरण मोहीम, गरोदर माता, स्तनदा मातांचे लसीकरण, पोषण आहार, गृहभेटी, ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहार बरोबर पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भौतिक विकासाच्या दृष्टीने हसत-खेळत शिक्षण देणे, ई- आकार प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, ऑनलाइन माहिती भरणे, रजिस्टर भरणे, जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे, शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबविणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे, भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवून देणे अशी अनेक कामे अंगणवाडी सेविका करीत आहेत. तरीही त्यांना अल्प मानधन मिळत आहे. त्यामुळे राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सरकारने मागण्यांची दखल न घेतल्याने जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नंदू गायकवाड, बुलढाणा जिल्हा सचिव सुरेखा तळेकर, तुळसा बोपले, शालिनी सरकटे, शशीकला नारखेडे, अलका राउत आदींसह इतरांनी सहभाग घेतला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत