ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनात स्फोट.

नाशिक : ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या गाडीत अचानक स्फोट झाला. या स्फोटमुळे ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या परिसरातील आसपासच्या इमारतीच्या चक्क काचा सुद्धा फुटल्या.
नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील पंपिंग स्टेशन येथे ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. हॉस्पिटलसाठी लागणारे ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनातील सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सिजन वाहून नेणारी गाडी डिवायडरला धडकल्याने गाडीतील दोन ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला.
या स्फोटामुळे परिसरात जोरदार आवाज झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की परिसरातील इमारतीच्या काचा देखील फुटल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली.
स्फोट झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ पोलीस पथक सुद्धा दाखल झाले. तसेच स्फोट झाल्याची बातमी सुद्धा वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांनी सुद्धा घटनास्थळावर मोठी गर्दी केली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी नागरिकांना घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत