“राज्यात जातीय तेढ निर्माण करू नये, नाहीतर पश्चात्ताप करावा लागेल, जरागे पाटील यांचा इशारा.

ओबीसी नेते छगन भुजबळ यांची इंदापूर येथे सभा पार पडणार आहे. त्या सभेबद्दल विचारले असता जरागे पाटील म्हणाले, की ‘त्यांना सभा घेण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी जातीय तेढ निर्माण करू नये. घटनात्मक पदावर बसले आहेत. ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने दंगलीची भाषा, कुन्हाडी-कोयत्याची भाषा करून राज्यात जातीय तेढ निर्माण करू नये. मराठा आरक्षणावर त्यांनी बोलू नये.’
पाडू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले, तर सरकारला पश्चाताप करावा लागेल, असे विधान जरांगे पाटील यांनी केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे
पोलिसांचा लाठीमार झाल्यानंतर ते चर्चेत आले. या लाठीमाराबाबत मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केल्यानंतर जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गुन्हे मागे घेतले नाही तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा उघडे
मुंबईः मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. याआधी मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी दोन वेळा उपोषण केले. दुसरे उपोषण मागे घेताना त्यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यतचा अल्टिमेटम दिला. तोपर्यत जरांगे पाटील हे राज्यभर फिरून मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. या – दौऱ्यादरम्यान जागोजागी भव्य सभा घेतल्या जात असून ते जनतेशी संवाद साधत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत